KRISHNA ...mix media work... - Bmanik Arts

Pencil Drawings, color pencils paintings, figurative paintings, color pencils portraits, landscapes and all types of commissioned artwork by Bmanik Arts.

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 15, 2017

KRISHNA ...mix media work...

नमस्कार , काय चाललंय मग...

                 आजचा विषय थोडा निराळाच आहे म्हणा. .. 

                 हे खाली पोस्ट केलेलं पैंटिंग बघा .. आता तुम्हाला समजलंच असेल कि आजचा विषय मी वेगळा आहे का बोलतोय ते....
                 चला बघुया आजच्या या खास पैंटिंग आणि त्याच्या शैली बद्दल..                 

            आजच्या ह्या पैंटिंग ची शैली थोडीसी हटके आहे .. कारण असं कि 2/3 वेगवेगळ्या शैली यामध्ये वापरल्या आहेत.  
               
                        1) जलरंग... 2) डोट वर्क... 3) रेखाटन.

            1) जलरंग हे जास्तीत जास्त वापरला जाणारं माध्यम आहे... आणि समजलं तर सोप्प आणि तेवढंच हाताळायला अवघड असं हे माध्यम आहे..( हे सर्व मानन्यावरती).. या चित्रामध्ये त्याचा योग्य आणि कलात्मक पद्धतीने वापर केला आहे. ज्या रंगसंगती मूळ मानल्या जातात त्या शीत आणि उष्ण रंगसंगतीचा वापर यामध्ये खूप छान पद्धतीने करण्यात आला आहे...तर हे झालं जलरंगा बद्दल..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

              
           2) डॉट वर्क (स्टिपलिंग पद्धत) हि खूप कमी प्रमाणात वापरली जाणारी एक शैली आहे... त्यामागचं कारण ही तसंच आहे. यामध्ये वेळ खूप लागतो आणि लक्ष्य केंद्रित करून हे काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट (बिंदू) पेपर वरती देताना काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे कारण त्यातला उठाव किंवा डार्क आणि लाईट या सगळ्या गोष्टीकरता डॉट्स नीट द्यावे लागतात.. बस इतकंच.... 
            
            3) रेखाटनाबद्दल बोलायचं झालं तर यामधील रेखाटन खूप वेगळं आणि चित्राला साजेसं केलेलं आहे.. डोळे, नाक आणि कपाळ यामध्ये योग्य रंगसंगती करीत रेखाटनाला एक वेगळं महत्व दिल गेलं आहे ...योग्य रेखाटनाला ( स्केचिंग) किती महत्व आहे हे या चित्र मध्ये आपल्याला दिसून येते.. वरील तिन्ही गोष्टींचा चित्रानुसार योग्य उपयोग केल्यामुळे ह्या चित्राला महत्व प्राप्त झालेलं आहे तर अशी आहे या पैंटिंग ची खासियत...
         
            पुन्हा आपण नक्की भेटूया आपल्या नवीन पैंटिंग आणि त्याच्या सखोल माहितीसहित..     
           तोपर्यंत नमस्कार ... काळजी घ्या...


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad