अरे थांब ...... . कुठे निघालास ...... माझं थोडं ऐकशील का ? ...हे तर माझं पण ऐकायला तयार नाही... ओ नो ... कुठं बरं गेलं असेल ..?
हे सगळं तुमच्या बद्दल बरोबर पण होत असेल... खर पाहिलं तर हे सर्वस्वी आपलं असूनही थोडही आपलं ऐकत नाही ... अरे हो तुम्हाला तर सांगायच राहूनच गेलं कि मी कोणाबद्दल बोलतोय.... सर्वस्वी आपलं ,स्वच्छंदी , बिनधास्त असं आपलं मन .... खरं सांगा तुमचं तरी ऐकत का हो हे ...?
पण ह्याच्या विरुद्ध पाहिलं तर जे आपलं नाही , ज्यावर आपला अधिकार हि नाही त्यावर आपण आपला हक्क गाजवायला लागलोय... मी बोलतोय आजच्या आपल्या समाजात , प्रत्येक घरात बंदिस्त असणाऱ्या स्त्री बद्दल .... जिला पूर्णता हक्क आहे आपलं मत मांडण्याचा , मनाप्रमाणे वागण्याचा ... पण काही ठिकाणी आजही स्त्री बंदिस्त आहे चार भिंती मध्ये , एका चोकटीत .... काही प्रमाणात स्त्री मुक्त झालीय जरूर... पण १००% नक्कीच नाही.... तिला पूर्णतः स्वतंत्र , मुक्त करण्याची आज गरज आहे ...
चला तर पाहूया अश्याच एका छान विषयावर मी काढलेलं एक सुंदर चित्र .... ज्यामध्ये किमयागारानी निर्माण केलेली मन हि रचना आणि त्यामध्ये १००% मुक्त मनाच्या दुनियेत असणारी ती स्त्री..
ही पैंटिंग अश्याच एका बंदिस्त स्त्रीच्या मनात उठणाऱ्या भावनांवर आधारित आहे.. मुख्य भागात ती एका चौकटीत बंदिस्त अशी दर्शवली आहे जिला मुक्त व्ह्याच आहे ... आणि दुय्यम भागात तिच्या मनाची अवस्था एका फुलपाखराच्या माध्यमातून दाखविली आहे ... ती स्वतः एका स्वच्छंदी ,मुक्त जगामध्ये बागडतेय ... तिचा हक्क आपण हिरावून घेता कामा नये...
पैंटिंग बद्दल सांगायचं झालं तर हे गॅलरी पेस्टल्स आणि डेरीवेन्ट पेस्टल्स पेंसिल्स मध्ये बनविले आहे ... त्याच्या काही पोस्ट मी खाली अपलोड करतोय नक्की पहा..
आणि माझी हि रचना आपल्याला कशी वाटली नक्की कळवा ... मी तुमच्या कंमेंट्स ची आणि लाईक्स ची वाट पाहतोय ...
मुक्त रहा , आनंदी राहा , मुक्त राहूद्या ..... भेटूया अश्याच एका नवीन पैंटिंग आणि त्यावरच्या लेखासहित तोपर्यंत नमस्कार ...
जय हिंद !!!! जय भारत !!!!
Nice thought
ReplyDelete